ऊस उत्पादकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रियंका गांधी यांचा यूपी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : प्रलंबित थकबाकीमुळे एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकार वर हल्लाबोल केला.

ट्वीट करताना, प्रियांका गांधी म्हणाल्या की, “ऊसाचे पीक शेतात वाळत चाललेले पाहिले तसेच त्याला कारखान्याची स्लिप न मिळाल्याने मुझफ्फरनगर येथील या ऊस उत्पादकाने आत्महत्या केली. 14 दिवसात संपूर्ण देयक देण्यात येईल, असा दावा भाजपाने केला आहे, पण हजारो कोटींच्या देयकाबरोबर साखर कारखाने बंद करण्यात येत आहेत. ”

“मी दोन दिवसांपूर्वी सरकारला माहिती दिली होती. या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसाचे पैसे न मिळाल्यामुळे या आर्थिक पेचप्रसंगी ते खूपच अडचणीत आले आहेत. परंतु आता भाजपा सरकार 14 दिवसांत ऊसाच्या देयकाचा उल्लेखही करीत नाही.

त्यांनी आपल्या ट्विटसह मुझफ्फरनगर ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक बातमीही जोडली आहे. कॉंग्रेस नेते गेल्या दीड वर्षात उत्तर प्रदेशच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here