ब्युनोस एअर्स : अर्जेंटिनामधील तुकुमन प्रांतातील सांता बार्बरा साखर कारखान्याचे क्रशिंग बंद करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात अपेक्षेपेक्षा आधीच सांता बार्बरा कारखान्याचे क्रशिंग बंद झाले आहे.
ए लास साईट या न्यूज वेबसाइटने याबाबत सविस्तर वृत्तांकन केले आहे. तुकमन प्रांतातील स्थानिक सरकारचे लेबर सचिव रॉबर्ट पालिना यांनी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापनाने कारखान्याचे क्रशिंग थांबवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील पंधरा दिवस हा कारखाना सुरू राहण्याची शक्यता आहे. सांता बार्बरा आणि न्युनोर्को हे दोन साखर कारखाने कामगारांना वेळेवर वेतन देत नव्हते, अशी माहितीही पालिना यांनी दिली.
पालिना म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत परिस्थिती इतकी बिघडेल, अशी अपेक्षा नव्हती. न्युनोर्को कारखान्यात अजूनही क्रशिंग होऊ शकते. पण, दोन्ही कारखाने मिळून दोन टन क्रशिंग करून शकणार नाहीत. ही खूप गंभीर परिस्थिती आहे. बार्बरा कारखान्याचा शिल्लक ऊस न्युनोर्को कारखान्याला दिला जाईल. त्यावर तो कारखाना आणखी ३० दिवस चालण्याची शक्यता आहे.’