डीसीओ नी केले मझोला मध्ये ऊस सर्वेचे निरीक्षण

पीलीभीत : जिल्हा ऊस अधिकारी यांनी मझोला क्षेत्रात सुरु असलेल्या ऊस सर्वेचे निरिक्षण केले आणि सर्वे पथकाला योग्य निर्देश दिले. शेतर्‍यांशी चर्चा केली. महिला स्वयं सहायता समूहाला ऊस बियाणे बनवण्याच्या दृष्टीने माहिती दिली.

जिल्हाभरात शेतकर्‍यांना उन्नतशील ऊस बियाने उपलब्ध करण्यासाठी महिला स्वयं सहायता समूहाला प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरुन हंगामामध्ये शेतकर्‍यांना उसाचे चांगले बियाने सोप्या पद्धतीने उपलब्ध होवू शकेल. या दिवसात जिल्हाभरात ऊस सर्वेचे काम गतीने सुरु आहे. आतापर्यंत 56 टक्क्यांपेक्षा अधिक ऊस सर्वे झाला आहे. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांनी मझोला क्षेत्रातील गाव कटिया, कुलारा आणि गिद्धौर मध्ये ऊस सर्वे कार्याचे निरिक्षण केले. शेतात जावून ऊस पीकाची तपासणी केली आणि शेतकर्‍यांकडून माहिती घेतली. डीसीओ यांनी शारदा महिला स्वयं सहायता समूहामध्ये गठीत प्रक्रिया पाहिली. त्यांनी विविध विभागीय कार्यांबाबत महिला समूहाला माहिती दिली. ते सोप्या पद्धतीने शेतकर्‍यांना बियाने उपलब्ध करु शकतील. यावेळी पीलीभीत चे ऊस विकास परिषदे चे एससीडीआई रामभद्र द्वीवेदी, विजयलक्ष्मी सह अनेक ऊस अधिकारी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here