साओ पावलो : ब्राझील
ब्राझीलच्या माटो ग्रोस्सो राज्यात कॉर्न इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. अॅमेझॉन आणि रोनाल्डोनिया या प्रांताच्या उत्तर भागातील मागणीनुसार येत्या काही वर्षांत त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. फ्लोहा दी एस. पावलो या वेबसाइटने ही माहिती दिली असून, या क्षेत्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे वेबसाइटने म्हटले आहे.
राबोबँक येथे साखर आणि इथेनॉलचे अॅनालिस्ट म्हणून काम करणारे अँडी डफ्फ यांच्या म्हणण्यानुसार खूप मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले, तर माटो ग्रोस्सोमध्ये १५० कोटी लिटर कॉर्न इथेनॉल उत्पादन करण्याची क्षमता आहे. यंदाच्या २०१७-१८ हंगामात माटो ग्रोस्सो प्रांतात १४० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. त्यातील २९ कोटी लिटर इथेनॉल कॉर्नमधून तयार झाले.
माटो ग्रोस्सो, अॅमेझोनास आमि रोंडोनिया या प्रांतांमध्ये गॅस आणि इथेनॉलवर चालणाऱ्या ओट्टो गाड्या मोठ्या प्रमाणावर धावतात. दरवर्षी त्यांची संख्या आठ टक्क्यांनी वाढत आहे.
डफ्फ यांच्या म्हणण्यानुसार सहज उपलब्ध होणारा कर्ज पुरवठा आणि स्थानिक नागरिकांचे वाढलेले उत्पन्न यामुळे ब्राझीलच्या या प्रांतात वाहनांची संख्या वाढत आहे. हायड्रेटेड इथेनॉलची उपयुक्तता आणि गॅसच्या तुलनेत जवळपास सारखीच असणारी किंमत याचाही परिणाम दिसत आहे.
जर या तीन राज्यांमध्ये गॅसची मागणी तेवढीच राहिली तर आगामी काळात इथेनॉलची मागणी निश्चितच वाढणार आहे. २०१३ पर्यंत ही मागणी १०० कोटी लिटरपर्यंत पोहचेल. इथेनॉल आणि त्याच्या किंमतीमध्ये हस्तक्षेप केला तर, तो खूप मोठा धोका ठरेल, त्यापेक्षा मोठे प्रोजेक्ट उभारणे सोयिस्कर ठरेल, असेही डफ्फ यांनी सूचविले आहे.