पुणे : चीनी मंडी
महाराष्ट्रात ऊस दर नियंत्रण मंडळाच्या समितीची स्थापना करण्यात आली. यंदाचा हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस दर नियंत्रण मंडळाच्या पहिल्या समितीची मुदत संपल्याने २०१७-१८ हंगामातील उसाच्या अंतिम दराची निश्चिती रखडली होती. त्यामुळे या समितीच्या निवडीचे स्वागत होत आहे.
विशेष निमंत्रित म्हणून सांगलीचे खासदार संजय पाटील आणि हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी तसेच कृषी भूषण संजय माने (आष्टा) यांचाही समावेश करण्यात आला आहे. सहकार आणि पणन विभागाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीमध्ये शेतकऱ्यांचे पाच प्रतिनिधी, सहकारी साखर कारखान्यांचे दोन, खासगी दोन तसेच विशेष निमंत्रित म्हणून चार शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील आणि साखर आयुक्तांच्या सदस्य सचिवांच्या उपस्थितीत समितीचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे.
समितीमधील इतर सदस्यांची नावे अशी, शेतकरी प्रतिनिधी : शिवानंद दरेकर (सोलापूर), प्रल्हाद इंगोले (नांदेड), पांडुरंग थोरात (पुणे), विठ्ठल पवार (पुणे), भानुदास शिंदे (पुणे). सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी : श्रीराम शेटे (नाशिक), धर्मराज काडादी (सोलापूर). खासगी कारखाना : तानाजी सावंत (उस्मानाबाद). विशेष निमंत्रित : खासदार संजय पाटील, वैभव नाईकवडी, संजीव माने आणि महमूद पटेल (सोलापूर).