नवी दिल्ली : कोरोना वायरस च्या वाढत्या फैलावामुळे 24 मार्च ला लॉकडाउनची घोषणा झाली. सर्व कंपन्यांनी आपापल्या कर्मचार्यांना कोणतीही सूचना न देता व्यवहार बंद केले . त्यानंतर सुरु झाली प्रवासी मजुरांना आपापल्या घरी पोचण्याची घाई. कसतरी करुन लिफ्ट घेत प्रवासी मजूर घरी पोहचत होते, तर कुणी सायकल तर हजारो लोकांनी पायी घरी जाण्याचा पर्याय निवडला. आता कंपन्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. आणि मजुरांना पुन्हा परत बोलवण्यात येत आहे, पण मजूर आता परत येण्यास साशंक आहेत. प्रवासी मजूरांना परत बोलवण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारची प्रलोभने दाखवत आहेत. इथपर्यंत की कंपन्या गावातील प्रमुखांशीही चर्चा करत आहेत की, मजूरांना कामावर पाठवा. त्या बदल्यात कंपन्या मजुरांना सुरक्षा देत आहे आणि तसेच त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्थाही स्वत:करायला तयार आहेत. अनेक मजुरांनी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण त्यासाठी कंपन्यांना चांगलेच झगडावे लागले आहे.
मुंबईच्या एका फार्मा कंपनीला गेल्या तीन महिन्यां मध्ये कामगार नसल्याने खूपच अडचणी आल्या. त्यानंतर कंपनी आपल्या कर्मचार्यांना येण्या जाण्यासाठी बसची सोय सुद्धा करणार आहे. केईसी इंटरॅनशल चे एमडी आणि सीईओ विमल केजरीवाल यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीतील काही मजूर परत आले आहेत. कंपनीकडून मजुरांचे परिवार आणि गावातील सरपंचांना मजूरांच्या सुरक्षेचे वचन दिले जात आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, काही परिसरांमध्ये मजुरांना फ्लाईटने आणले जात आहे.
मजुरांना परत आणण्यासाठी बस आणि ट्रेन पेक्षा पुढे जावून कंपन्या फ्लाईटसमधूनही मजुरांना परत बोलावले जात आहे. कंपन्यांकडून मजुरांना राहण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. मजुरांना परत आणण्यासाठी कंपन्या दोन्ही राज्यातून अधिक़ार्यांची परवानगी मागत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.