पणजी : संजीवनी साखर कारखान्याच्या मुद्यावरुन गोव्यात राजकारण तापले आहे. विरोधी नेते दिगंबर कामत यांचा दावा आहे की, सरकार कारखाना बंद करणार आहे. आतापर्यंत सरकार कडून कारखाना बंद करण्याबाबत कोणतीही औपचारिक सूचना आलेली नाही. दिगंबर कामत म्हणाले, सरकारकडून नियुक्त प्रशासकाकडून संजीवनी साखर कारखाना स्थायी रुपात बंद करण्याची घोषणा करण्यात आली, जो गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बंदोडकर यांनी स्थापन केला होता. त्यांनी आरोप की, सरकारचा हा निर्णय गोव्यातील शेतकर्यांच्या विरोधातला आहे.
त्यांनी दावा केला की, मला सहकारमंत्री गोविंद गौड यांच्याकडून स्पष्ट अश्वासन दिले गेले होते की, संजीवनी साखर कारखाना बंद केला जाणार नाही आणि ऊस शेतकर्यांच्या हितांचे पूर्णपणे रक्षण केले जाईल. पण आता सरकारने यू टर्न घेतला आहे. सरकारने कोरोना वायरसच्या संकटा दरम्यान हा निर्णय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारला.
कामत म्हणाले, संजीवनी साखर कारखाना बांदोडकरांचे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्यांनी गोव्यामध्ये स्थानिक ऊस उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कारखान्याची स्थापना केली. सरकारने कुणालाही विश्वासात न घेता हा कारखाना बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. कामत म्हणाले, गोविंद गौड यांनी संजीवनी साखर कारखान्याच्या जमीनीच्या वापरासंदर्भात सर्व शेतकरी आणि हितधारकांना विश्वासात घ्यावे. मंत्री गोविंद गौड यांनी कोणत्याही अंतिम निर्णयावर पोचण्यापूर्वी सर्वांचे मत जाणून घेतले पाहिजे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.