ऊस पीक पोक्का बोईंग आजाराच्या विळख्यात

रुडकी : पोक्का बोईंग आजार आणि पाउस न झाल्यामुळे दुष्काळाच्या विळख्यात येत असलेल्या पीकाने शेतकरी चिंतेत आहे. दोन्ही परिस्थितीशी निपटण्यासाठी शेतकर्‍यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून परिसरामध्ये ऊसाचे पीक पोक्का बोईंग नामक वायरसच्या विळख्यात सापडले आहे. फंगस सारखा हा आजार पीकाला पूर्णपणे नष्ट करुन टाकतो. याच्याशी निपटण्यासाठी शेतकर्‍यांना पीकावर महागड्या औषध फवारन्या कराव्या लागत आहेत . शेतकरी सुधीर कुमार यांनी सांगितले की, त्यांचे आठ एकर पीकामध्ये या आजाराचा परिणाम दिसत आहे. पीकाला आजारापासून वाचवण्यााठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागेल.

शेतकरी रतन सिंह, कलिप कुमार, पारुल आदींनी सांगितले की, गेल्या वर्षीही पोक्का बाईंग आजाराने ऊसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान केले होते. हा आजार एका शेतातून दुसर्‍या शेतात अगदी सहजपणे पोचतो. याची लक्षणे दिसताच रोग रोधी औषधाची फवारणी करावी लागते. ते म्हणाले, शेतकर्‍यांना यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याशिवाय अजूनही पाउस न झाल्याने पीके दुष्काळाच्या सावटाखाली आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here