साओ पाऊलो: भारताप्रमाणेच ब्राजील आणि अर्जेंटीना मध्येही टोळांच्या हल्ल्याचे सावट आहे. या धोक्याला पाहून दोन्ही देशातील सरकार टोळांच्या हल्ल्याचे निरिक्षण करत आहेत. टोळांचे एक झुंड, जे एका दिवसात 150 किमी (93 मील) चे अंतर कापु शकतो, पूर्वीच पैराग्वे पासून अर्जेंटीना पर्यंतची यात्रा केली आहे आणि ही शंका आहे की ब्राजील आणि उरुग्वे त्यांचे पुढचे टार्गेट असू शकतात. ब्राजील सरकार ने शेतकऱ्यांना सुचित केले की, त्यांनी टोळांच्या हल्ल्याबाबत सावध रहावे.
टोळांचे दल पैराग्वे मध्ये उत्पन्न झाले आणि 21 मे ला अर्जेंटीनामध्ये दाखल झाले. टोळ पूर्वीपासूनच अर्जेंटीना च्या सांता फे आणि फॉर्मोसा प्रांतात दाखल झाले आहेत , जिथे त्यांनी मका, ऊस, गहू आणि ज्वारीच्या पीकाचे खूप मोठे नुकसान केले आहे. टोळाचे दल सध्या कोरिएंटेस प्रांतात आहे आणि तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा परिणाम कमी करण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. टोळांचे झुंड चे बारकाव्याने निरिक्षण ब्राज़ील आणि उरुग्वे करत आहे. अर्जेंटीना आणि आसपासचे देश टोळ दलासाठी अनोळखी नाही. अलीकडेच 2017 आणि 2019 मध्ये अर्जेंटीना मध्ये मोठ्या प्रमाणावर टोळा चा हल्ला झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.