बिजनौर: भारतीय लोक शक्ति च्या नेतृत्व मध्ये शेतकऱ्यांनी ऊस थकबाकीवरून उत्तम शुगर मिलच्या गेट वर धरणे आंदोलन केले. भाकियू लोक शक्ति जिल्हा अध्यक्ष चौधरी वीर सिंह सहरावत यांच्यानेतृत्वामध्ये उत्तम शुगर मिल गेट वर शेकडोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी निवेदन देऊन उत्तम शुगर मिल बरकतपुर उपाध्यक्ष नरपत सिंह यांच्यााकडे 30 जून पर्यत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे पैसे मागितले होते. अन्यथा 1 जुलै पासून अनिश्चितकालीन धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. पण मिल प्रशासनाने निवेदनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच भाकियू लोक शक्ति च्या वतीने उत्तम शुगर मिल गेट वर आंदोलन सुरु झाले तसेच ऊसाचे पैसे न दिल्यास अनिश्चितकालीन धरणे धरणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांंशी चर्चा करण्यासाठी कारखाना प्रशासनाचा कोणताही अधिकारी आला नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप दिसून आला. उत्तम मिल उपाध्यक्ष नरपत सिंह यांनी भाकियू लोक शक्ति च्या अनिश्चितकालीन धरणे आंदोलनास व्यक्तिगत विरोध रूपी आंदोलन असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्यांच्या कारखान्याने सर्वाधिक 65 टक्के थकबाकी भागवली आहे. उर्वरीत थकबाकी लवकरच देऊ केली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.