साखर कारखान्यात वीस महिन्यात तयार होणार पॉवर प्लांट

बाजपूर : सहकारी साखर कारखाना संघ आणि उत्तराखंड जल विद्युत निगम च्या अधिकार्‍याच्या पथकाने संयुक्तपणे साखर कारखान्याचे निरीक्षण केले. अधिकार्‍यांनी सांगितले की, बाजपूर साखर कारखान्यामध्ये पॉवर जनरेशन प्लांट लावण्यासाठी जुलै महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरु होईल. प्लांट वीस महिन्यांमध्ये तयार होईल. दरम्यान, साखर कारखाना कर्मचार्‍यांनी उत्तराखंड साखर कारखाना संघाचे ए.डी चंद्रेश यादव यांना पाच सूत्रीय मागणी पत्र दिले.

बुधवारी उत्तराखंड सहकारी साखर कारखाना संघाचे एमडी चंद्रेश यादव, उत्तराखंड जल विद्युत निगम लिमिटेड चे प्रमुख निदेशक संदीप सिंघल, डीजीएम सचिन डंगवाल, शुगर फेडरेशन चे व्यवस्थापक राजीवि लोचन शर्मा यांनी अधिकार्‍यांच्या पथकासह बाजपूर साखर कारखान्यात पोचले. अधिकार्‍यांच्या टीमने साखर कारखान्यामध्ये लावण्यात येणार्‍या पॉवर प्लांट च्या जमिनीचे निरिक्षण केले. संघाचे एमडी चंद्रेश यादव म्हणाले, पॉव प्लांट साठी 27 जुलैला टेंडर मागवण्यात आले आहेत. आगामी ऊस गाळप हंगामाच्या समाप्तीनंतर च पॉवर प्लांट लावण्याचे काम सुरु होईल. प्लांट लावण्यास वीस महिन्याचा वेळ लागेल. गाळप हंगाम बाधित होवू नये अशाप्रकारची योजना तयार करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया मार्च महिन्यामध्ये सुरु करण्यात येणार होती पण लॉकडाउन मुळे या कामाला गती मिळाली नाही. दि. 24 डिसेंबर 2016 ला कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांनी 154 करोड रुपयांच्या या पॉवर प्लांट योजनेची पायाभरणी केली होती . पथकासह कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रकाश चंद, मुख्य ऊस अधिकारी डॉ. राजीव कुमार, सीए एके श्रीवास्तव, सचिन ठाकूर आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here