लखनऊ: भारतामध्ये टोळांचा धोका अजूनही तसाच आहे. सध्या देशामध्ये टोळांनी कोणतेही गंभीर नुकसान केले नाही, पण शेतकरी अजूनही यामुळे चिंतेत आहेत. टोळ दल भारताच्या अनेक राज्यांमध्ये घुसले आहेत. प्रशासनाने सांगितले की, प्रशासन टोळांचा सामना करण्यासाठी पूर्ण पणे तयार आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनौ, बाराबंकी जिल्ह्यांमध्ये रविवारी टोळांचे एक दल आले आहे. टोळांना पळवण्यासाठी शेतकरी थाळ्या वाजवत आहेत. आणि एलओसी अग्निशामकांसह कीटनाशकांची फवारणी करत आहेत. इतर झुंड शनिवारी हरियाणा च्या झज्जर, भिवानी आणि सिरसा, चरखी, दादरी जिल्ह्यामध्ये दिसून आले. आणखी एका झुंडीने राजस्थान मध्ये प्रवेश केला आहे. टोळांची दहशत आता काही राज्यांपर्यंतच सिमित नाही. टोळ अनेक राज्यांमध्ये आहेत.
आतापर्यंत भारतामध्ये नुकसान कमी झाले आहे, पण जाणकारांच्या मते पुढचे 3 ते 4 आठवडे टोळांना नियंत्रीत करण्यात महत्वपूर्ण राहतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.