कार्यालय आणि गावांमध्ये ऊस विभाग करत आहे सॅनिटायझेशन

लखीमपूर : जागतिक महामारी कोरोनापासून बचावासाठी ऊस विभाग विविध गावांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये सॅनिटायझेशन करत आहे. साखर कारखान्याच्या सहयोगाने विकासखंड पसगवा च्या थाना, ब्लॉक आणि गावातील सॅनिटायजेशन करण्यात आले. याबरोबरच गरजू ग्रामीण लोकांना मास्कचे वितरणही केले जात आहे. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यााठी ऊस विभाग साखर कारखान्यांच्या मदतीने सर्व ऊस परिक्षेत्राचे सॅनिटायझेशन होत आहे. जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, अजबापूर साखर कारखान्याच्या सहयोगाने पसगवा येथील विविध गावात आणि सरकारी कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले याप्रकारे सर्व साख़र कारखान्यांचा परिसर, गावे सॅनिटायज केली जात आहेत. ऊस विभागाचे कर्मचारी कोरोना वायरस च्या बचावासाठी सातत्याने सॅनिटाइजरची फवारणी करत आहेत. तर शेतकर्‍यांनाही कोरोना च्या बचावासाठी जागरुक केले जात आहे. शेतकरी कृषी कार्या दरम्यान शारिरीक अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करावे आणि मास्क आवश्य लावावा. कर्मचारी त्यांना साबणाने हात धुणे आणि सॅनिटायजरचा उपयोग करण्याचा सल्ला देत आहेत. जिल्ह्यातील सर्व थाने, कोतवाली, चौक्या, ब्लॉक कार्यालये, गाव सातत्याने सॅनिटाइज केली जात आहेत. आताही हे कार्य सुरु आहे. जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, सॅनिटायझेशनच्या कार्या मध्ये असणारे ऊस विभागाचे तसेच साखर कारखान्यातील कर्मचारी सोशल डिस्टसिंग चे नियम पाळून काम करत आहेत. त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी एकमेकात योग्य अंतर राखून काम करावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here