नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाची स्थिती नाजूक आहे. याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही माहिती फडणवीस यांनी एका ट्वीटद्वारे दिली आहे.
ट्वीटमध्ये ते म्हणाले की, मी आणि महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.भेटी दरम्यान आम्ही एमएसपी, कर्जांचे पुनर्गठन, साखर उद्योगासाठी सॉफ्ट लोन सारख्या विविध मागण्या सादर केल्या. ज्यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.
ते म्हणाले, आम्ही नरेंद्र सिंह तोमर आणि रामविलास पासवान यांनादेखील भेटणार आहोत. साखर उद्योगाशी संबंधीत बाबी आणि शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर एक विस्तृत निवेदन देणार आहोत.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या एका समूहाने बुधवारी साखर कारखान्यांच्या न्यूनतम विक्री मूल्य वाढवून 33 रुपये प्रति किलो करण्याची शिफारस केली होती.