पटना: कोरोना (Corona) चा कहर अजूनही सुरुच आहे, पण रोजी रोटी साठी प्रवासी श्रमिक पुन्हा औद्योगिक शहरांकडे वळत आहेत. उद्योजकांनी सांगितले की, अनेक मजूर परतण्यास तयार आहेत, पण रेल्वे नियमितपणे सुरु नसल्याने ते येऊ शकत नाहीत.
दिल्ली च्या ओखला चैंबर ऑफ इंडस्ट्रीज चे चेयरमन अरुण पोपली म्हणाले, कारखाने सुरु झालेले कळताच घरी परतलेले अनेक मजूर पुन्हा कामावर येऊ इच्छीत आहेत, पण रेल्वे सुरु नसल्याने ते येऊ शकत नाहीत. ज्यांना परतण्याचे साधन मिळाले आहे ते कामावर येत आहेत. जर रेल्वे नियमित पणे सुरु झाल्या तर गावाकडे गेलेल्या कामगाारांन इकडे येणे सोपे जाईल. कारण बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील पूरामुळे मजुरांकडे कोणतेही काम नाही.
दिल्ली च्या मायापुरी इंडस्ट्रियल वेलफेयर एसोसिएशन चे जनरल सेक्रेटरी नीरज सहगल यांनी सांगितले की, बिहार मध्ये कोरोना प्रकोप वाढल्याामुळे लॉकडाउन (Lockdown) आहे आणि रेल्वे ही सुरु नाहीत त्यामुळे मजूर येऊ शकत नाहीत. पण ते यायला तयार आहेत.
ते म्हणाले, खूप मजूर बिहार आणि उत्तर प्रदेश येथूनच येतात आणि बिहार च्या अनेक भागात यावेळी पूर आला आहे, तिथे मजुरांना काहीच काम नाही, त्यामुळे ते शहरात येऊ इच्छीत आहेत, पण ते येऊ शकत नाहीत. सध्या मर्यादित संख्येने रेल्वे सुरु आहेत, ज्यातून प्रवास करण्यासाठी रिजर्वेशन करावे लागते, पण मजूर तर जनरल तिकीट घेऊन प्रवास करतात. एनसीआर स्थित साहिबाबाद इंडस्ट्रीज एसोसिएशन चे प्रेसीडेंट दिनेश मित्तल म्हणाले, मजूर जनरल तिकीट घेऊन प्रवास करतात, त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. ते म्हणाले, गावात आता शेतीचे कामही संपले आहे. मजुरांंसाठी तिकडे कोणतेच काम नाही. वाहतुुक सुरू होईल तसे असंख्य मजुर शहराकडे परत येतील. गावात या दिवसात प्रवासी मजुरांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी, गरीब कल्याण रोजगार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम (MNREGA) सह अनेक योजनांवर सरकार विशेष जोर देत आहे, पण कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांना जेव्हा हे समजेल की कारखाने सुरु झाले आहेत, तेव्हा ते गावात थांबणार नाहीत.
कोरोना वायरस संक्रमणाला रोखण्यासाठी 25 मार्च ला जेव्हा संपूर्ण देशात बंदी होती. तेव्हा अधिकांश कारखाने बंद होण्या बरोबरच रेल्वे आणि बस सेवांसह प्रवाशांसाठी, सर्व सार्वजनिक परिवहन सेवा ठप्प झाल्याने प्रवासी श्रमिक पायी च घरी परतू लागले होते, ज्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना परतण्यासाठी विशेष व्यवस्था केली आणि श्रमिक स्पेशल रेल्वे चालवल्या. जर अशा प्रकारे मजुरांना गावातून परत आणण्यासाठी अशी विशेष व्यवस्था केल्यास मोठया प्रमाणात मजूर पुन्हा कामावर येतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.