भारतात कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांवर

गेल्या 24 तासामध्ये देशामध्ये कोरोनाची एकूण 48 हजार 512 नवी प्रकरणे आढळली आहेत. याबरोबरच 768 लोकांचा मृत्यूही झाला आहे. सध्या भारतातील संक्रमितांचा आकडा वाढून 15 लाख 31 हजाराच्या पार केला आहे. तर मरणार्‍यांची संख्या 34 हजार 193 वर पोचली आहे. इतकेच नाही तर भारतात अ‍ॅक्टिव्ह केसच्या संख्याही पहिल्यांदाच 5 लाखाच्या पुढे पोचली आहे.

देशामध्ये सर्वात अधिक प्रभावित राज्यांबाबत सांगायचे झाल्यास तर महाराष्ट्रामध्ये अवस्था खराब झाली आहे. इथे आता पिडितांची संख्या 3 लाख 91 हजारावर पोचली आहे. तर 24 तासामध्ये 282 नव्या मृत्युंसह आता मृतकांची संख्या 14,165 झाली आहे. देशातील एकूण मृत्युंमध्ये एक तृतीयांश पेक्षा अधिक भाग महाराष्ट्राचा आहे.

संक्रमित राज्यांमध्ये दुसरा नंबर तामिळनाडूचा आहे. जिथे एक दिवसांमध्ये सर्वात अधिक 6972 नवे संक्रमित आढळले आहेत. याबरोबरच राज्यामध्ये आता पिडितांचा आकडा 2 लाख 27 हजार 688 झाला आहे. तिसर्‍या नंबरवर 1 लाख 32 हजार 275 केस सह दिल्ली आहे. तिसर्‍या नंबरवर दिल्ली मध्ेय 3881 मृतांच्या तुलनेत तामिळनाडू मध्येही 3659 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सध्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी अशी की, आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी जवळपास 64 टक्के अर्थात 9 लाख 88 हजार पेक्षा अधिक लोक बरे होवून घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांमध्येही 35 हजारापेक्षा अधिक रुग्ण बरे होंवून गेले आहेत. देशामध्ये अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 5 लाख 9 हजार 447 आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here