तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान पश्‍चिम आणि मध्य भारतात मोठा पाऊस पडण्याचा अंदाज

नवी दिल्ली : हवामान विभागाने मध्य आणि पश्‍चिम भारतामध्ये चार ऑगस्टपासून पुढचे तीन चार दिवस मोठा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. विभागानुसार चार ऑगस्ट च्या आसपास उत्तरी बंगाल च्या खाडी वर कमी दबावाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांच्या दरम्यान मान्सून ची दिशा दक्षिने कडे होणे आणि पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे.

विभागाने सांगितले की, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि घाट क्षेत्र, तटीय कर्नाटक तथा केरळमध्ये तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान मोठा पाऊस पडण्याची आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 4 ऑगस्टला किनारपट्टी लगतचा महाराष्ट्र आणि गोव्यासाठी रेडवार्निंग जारी केली आहे. 3 ऑगस्ट ला मुंबई मद्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 4-5 ऑगस्ट ला मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पाच ऑगस्टला गुजरात क्षेत्रातीळ किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि सहा ऑगस्ट ला उर्वरीत राज्यामध्ये व्यापक पावसाचे अनुमान आहे.हवामान विभागाने 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला ओडिसा , छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीआहे. या अवधी दरम्यान झारखंड आणि पश्‍चिम बंगाल मध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here