मुंबई: मुंबई आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यानेे फार मोठे नुकसान केले आहे. शहर आणि त्याच्या आसपाच्या परिसरामध्ये खराब हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती झाली आहे. घरांमध्ये पाणी घुसले आहे. याचा परिणाम जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टवरही झाला.
वादळी वार्यामुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट वर कंटेनर उठवणार्या तीन क्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. उच्च क्षमतेंची क्रेन काल दुपारी जोरदार वार्यामुळे खाली पडली. यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. सध्या किती नुकसान झाले याबाबत आकलन केले जात आहे. जेएनपीटी देशाच्या सर्वात मोठ्या बंदरापैकी एक आहे. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या काही परिसरांमध्ये एनडीआरएफ चे पथके तैनात केली आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.