नैरोबी : साखरेच्या किमंतीत एक महिन्यात 14 टक्के घट झाली आहे. 50 किलोच्या बॅगसाठी ठोंक साखरेची किंमत एसएच5,500 हून कमी होवून एसएच4,700 झाली आहे. यानंतर एक्स फैक्ट्री च्या किंमती 50 किलो च्या बॅगसाठी एसएच 5,100 हून कमी होवून एसएच 4,100 झाली आहे, बाजारामध्ये सामान्य पुरवठा पुन्हा सुरु होण्याचे हे संकेत आहेत.
साखर निदेशालयाच्या एका अधिकार्याने सांगितले की, बाजाराने कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय स्वतःला व्यवस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, बाजारात असे लोग होते की, जे आयातीवरील प्रतिबंधाच्या घोषणेनंतर साखरेची तस्करी करत होते. पण जेव्हा त्यांना साखर पुरवठा सामान्य झाल्याची जाणिव झाली, तेव्हा त्यांनी आपल्या साखरेच्या स्टॉकला बाजारामध्ये जारी करण्याचा पर्याय निवडला.
साखर निदेशालयाने सांगितले होते की, बाजारामध्ये साखर पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता आणि मूल्यात वाढ का झाली याची तपासणी करत आहेत. कृषी कैबिनेट सचिव पीटर मुन्या यांनी एक महिन्यापूर्वी साखरेच्या आयातीवर प्रतिबंध लागू केला होता. आणि सध्याच्या आयातीच्या सर्व परवानग्या रद्द केल्या होत्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.