उत्तराखंड मधील अनेक भागांमध्ये मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पातळ्यांचा स्तर वाढला आहे. आणि नियमीतपणे भूस्खलन होत आहे. भारताच्या हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसामध्ये राज्यामद्ये वेगवेगळ्या ठिकाणी विज पडण्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे.
चमोली मध्ये थांबून थांबून होत असलेल्या पावसाने स्थानिक लोकांचा जिव धोक्यात आला आहे, कारण डोंगरावरुन दगड पडण्यामुळे बद्रीनाथ राजमार्ग बंद झाला आहे. यामुळे स्थानिक लोकांना आपल्या घरापर्यंत पोचण्यासाठी अचडणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यामद्ये संततधार पावसामुळे अलकनंदा, पिंडर, नंदाकिनी नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहात आहेत. चमोली च्या जिल्हाधिकारी स्वाति एस भदोरिया यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत.
त्यांनी सांगितले की, रस्ते भूस्खलनामुळे बंद आहेत, तिथे रस्ते सुरु करण्याचे काम सुरु आहे. विजेचे खांब उखडले आहेत. आणि त्यांना ठीक करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक तहसील मध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.