नवी दिल्ली: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढून 26 लाख 47 हजार 664 झाली आहे. 24 तासांमध्ये 57 हजार 982 नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी 941 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 24 तासामध्ये अमेरीकेमध्ये 36,843 नवे रुग्ण आढळले आहेत. आणि 522 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ब्राझीलमध्ये गेल्या काही दिवसात 22,365 नवे रुग्ण आढळले आहेत. आणि 582 लोकांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत 50 हजार 921 लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. आता भारतामध्ये सरासरी दररोज 900 लोक मृत्यु पावत आहेत.
भारतामध्ये यापूर्वीच एक लाख कसेस पूर्ण होण्यात 110 दिवसांचा काळ लागला होता, पण आता दोन दिवसांमध्ये एक लाख पेक्षा अधिक केस नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या 90 दिवसांमध्ये जवळपास 25 लाख नवे रुग्ण समोर आले आहेत. एक चांगली गोष्ट आहे की, कोरोनामुक्त झालेलया रुग्णांचा आकडाही 19 लाखावर आहे. रविवारी 57 हजार 404 लोकांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये आता कोरोना चे 6 लाख 76 हजार 900 अॅक्टीव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 19 लाख 19 हजार 843 लोक रिकवर झाले आहेत.
देशामध्ये सर्वात अधिक अॅक्टीव्ह केस महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये दीड लाखापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. यानंतर दुसर्या नंबरावर तामिळनाडू, तिसर्या नंबरवर दिल्ली, चौथ्या नंबरवर गुजरात आणि पाचव्या नंबरवर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वात अधिक अॅक्टीव्ह केस आहेत. अॅक्टीव्ह केसच्या बाबतीत भारत जगातील तिसर्या नंबरचा देश आहे. कोरोना ग्रस्तांच्या संख्येमध्ये भारत जगातील तिसर्या नंबरचा देश आहे. अमेरिका, ब्राझील नंतर भारत कोरोना प्रभावित देश आहे.
महाराष्ट्रामध्ये रविवारी कोरोनाच्या 11 हजार 111 केस समोर आल्या आहेत. गेल्या 24 तासात 8,837 लोकांना डिस्चार्ज केले आहे. दरम्यान 288 लोकांचा मृत्यु झाला आहे. राज्यामध्ये कोरोंना वायरसमुळे आतापर्यंत एकूण 5 लाख 95 हजार रुग्ण संक्रमित झाले आहेत. यापैकी 4 लाख 17 हजार 123 लोक बरे झाले आहेत.
बिहारमध्ये एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या वाढून 1,04,093 झाली आहे. दरम्यान 3,891 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यामध्ये बरे होणार्या रुग्णांची संख्याही वाढून 72,566 झाली आहे. रिकवरी दरही वाढून 69.17 टक्के झाला आहे.
उत्तर प्रदशामध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासात 56 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 4,454 नवे रुग्ण आढळले आहेत. तर यूपीमध्ये 2,449 लोकांचा मृत्यु झाला आहे.
इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्च ने दिलेल्या माहितीनुसार, देशामद्ये आतापर्यंत 3 करोड 41 हजार 400 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. रविवारी एकूण 7 लाख 31 हजार 697 लोकांची तपासणी करण्यात आली.
आता जगभरामध्ये प्रत्येक दिवशी अमेरिका, ब्राजील आणि भारतामध्ये मृत्यु होत आहेत. जगभरामध्ये होणार्या मृत्युंमध्ये18.83 टक्के लोक अमेरिका, 16.93 टक्के लोक ब्राजील आणि 16.65 टक्के लोक भारतातील आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.