नवी दिल्ली: कोरोना वायरस संक्रमण भारतामध्ये वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासात या महामारीच्या 55,079 अॅक्टीव्ह केस समोर आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार कोविड 19 मुळे गेल्या 24 तासामध्ये 876 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
भारतात जर कोरोनाच्या आकड्यांचा विचार केला तर आतापर्यंत 27,02,743 रुग्ण झाले आहेत . यापैकी 6,73,166 अॅक्टीव्ह केस आहेत. तसेच एकूण 19,77,780 रुग्णाना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत कोरोना संक्रमणामुळे 51,797 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे 288 रुग्णांच्या मृत्युनंतर रविवारी राज्यामध्ये मृतकांची एकूण संख्या 20,000 च्या पुढे गेली आहे. राज्यात 11,111 नवे रुग्ण समोर आले आहेत, ज्यामुळे संक्रमणाच्या केसची एकूण संख्या 5,95,865 पर्यंत पोचली आहे. संक्रमणामुळे होणार्या मृत्युंची संख्या आता 20,037 आहे. रविवारी बरे झाल्यानंतर एकूण 8,837 रुग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला आहे. ज्यानंतर राज्यामध्ये कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून 4,17,123 इतकी झाली आहे. राज्यात आता 1,58,395 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतामध्ये कोरोना तपासणीबाबत बोलायचे झाल्यास याचा वेग आता वाढला आहे. भारताने आतापर्यंत तीन करोड कोरोना तपासन्या केल्या आहेत. कोविड 19 साठी 16 ऑगस्ट पर्यंत 3,00,41,400 नमुन्यांचे परीक्षण केले. यामध्ये सोमवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने 7,31,697 कारोना सॅम्पलची तपासणी केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.