नवी दिल्ली: चीनी मंडी
ब्राझीलला मागे टाकत भारत आता जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, देशातील साखर उद्योगापुढे सर्वांत मोठे आव्हान उभे आहे. मावळत्याहंगामात देशात ९८ ते १०० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
भारताने गेल्या २०१७–१८च्या हंगामात ३२० लाख टन साखर उत्पादन करून उच्चांक प्रस्थापित केला. येत्या २०१८–१९च्या हंगामात भारतात ३५० ते ३५५ लाख टन साखरेचेउत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामुळे भारत ब्राझीलसारख्या देशाला साखर उत्पादनात मागे टाकणार आहे.
देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा घसरलेला दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही फारशी समाधानकारक स्थिती नसल्यामुळे भारतात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याचीसर्वांत मोठी समस्या आहे. घटलेली मागणी आणि अतिरिक्त साठ्यामुळे साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.
ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील साखरेची झालेली २३० ते २३२ लाख टन विक्री आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत होणारी २० लाख टन संभाव्य विक्री गृहित धरली, तर या हंगामात२५० ते २५२ लाख टन साखर विक्री होणार आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच भारताकडे तब्बल ९८ ते १०० लाख टन साखर शिल्लक असणार आहे. या साखरेचा बोजाघेऊनच पुढच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याने या अतिरिक्त साखरेच्या संकटातून बाहेर कसे पडावे, असा प्रश्न साखर उद्योगातील प्रत्येकापुढे आहे.