मोठा दिलासा; केंद्र सरकारकडून कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत कच्च्या तेलाच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स ४९०० रुपये प्रती टनावरुन कमी करून तो १७०० रुपये प्रती टन करण्यात आला आहे. यासोबतच एटीएफवरील निर्यात शुल्कही पाच रुपये प्रती लिटरपासून घटवून १.५ रुपये प्रती लिटर करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, कराचे नवे दर आजपासून लागू करण्यात येतील. या निर्णयामुळे ज्या कंपन्या कच्चे तेल पेट्रोल, डिझेल आणि एटीएफला निर्यात करतात, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यापूर्वी एक डिसेंबर २०२२ रोजी विंडफॉल टॅक्सबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने देशांतर्गत कच्च्या तेलाच्या विक्रीवर हा कर १०,२०० पासून घटवून ४,९०० रुपये प्रती टन करण्यात आला होता. तर पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स समाप्त करण्यात आला होता. मात्र, एटीएफवरील कर पाच रुपये प्रती लिटरवर कायम ठेवण्यात आला होता. सुरुवातीला जेव्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला, तेव्हा तो कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, एटीएफवर लागू करण्यात आला होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या नंतर अनेक इंधन कंपन्यांच्या नफ्यात वाढ दिसून आली होती. त्यामुळे सरकारने एक जुलैपासून विंडफॉल टॅक्सची आकारणी केली होती. सुरुवातीला पेट्रोलवर प्रती लिटर सहा रुपये तर डिझेलवर १३ रुपये प्रती लिटर कर लागू केला होता. तर कच्च्या तेलावर २३,५०० रुपये प्रती टन विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here