बुलंदशहर : जहांगीराबाद विभागात शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात ऊस खरेदी करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या ४ माफियांविरोधात साखर कारखान्याच्या सचिवांनी फिर्याद नोंदवली. मंगळवारी रात्री साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी उसाने भरलेल्या दोन ट्रॉली ताब्यात घेतल्या. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला होता. जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील दि सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ऊसाने भरलेल्या दोन ओव्हरलोड ट्रॉली पकडल्या. त्यानंतर कारखान्याबाहेर तणाव निर्माण झाला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उसाने भरलेल्या ट्रॉली घेवून कारखान्याचे अधिकारी जहांगीराबाद येथे कारखान्यावर आले. त्यानंतर कारखान्याचे सचिव राहुल कुमार यादव यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अनुपशहरमध्ये अधिकाऱ्यांना पाहणी वेळी हे दोन ट्रॅक्टर ट्रॉली आढळल्या होत्या. दोन्हीच्या चालक आणि क्लिन्नरला पकडण्यात आले. संशयितांनी अनुपशहरमधून २५० रुपये प्रती क्विंटल दराने ऊस खरेदी करून तो जिल्ह्याबाहेरील किमतीला विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न चालवला होता. ट्रॉली यार्डमध्ये आणताना हे ऊस माफिया पळून गेले. याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली असल्याचे जहांगीराबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार यांनी सांगितले.