पुरंदरसाठी सहकारी साखर कारखाना सुरू करणार : आ. संजय जगताप यांची घोषणा

पुणे: पुरंदर परिसरात ऊस उत्पादन वाढल्याने आता या परिसरासाठी स्वतंत्र साखर कारखान्याची गरज आहे. पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या स्वतःचा असा साखर कारखाना आगामी काळात सुरू करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले. रविवारी पिंपरे खुर्द येथील एका कार्यक्रमात आमदार संजय जगताप बोलत होते. पुरंदर तालुक्यामध्ये सध्या उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्याच्या शेतातील ऊस वेळेवर तोडला जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार जगताप यांनी पुरंदर तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.

आमदार जगताप म्हणाले की, सध्या पुरंदर उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. माजी मंत्र्यांकडे कार्यकर्तेच राहिले नाहीत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारीच त्यांनी कामाला लावले आहेत. विरोधकांनी सध्या लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. माजी मंत्री हे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांना गुंजवणी पाणीपुरवठा योजना करता आली नाही. त्यांना त्या खात्याचे मंत्री असताना जे काम पूर्ण करता आले नाही, त्याबद्दल त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here