भारताच्या परकीय चलन साठ्यात २.१६ अब्ज डॉलरची घट

देशातील परकीय चलन साठा २१ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात २.१६४ अब्ज डॉलरने घटून ५८४.२४८ अब्ज डॉलरवर आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. यापू्र्वी गेल्या आठवड्या, देशाचा परकीय चलन साठा १.६५७ अब्ज डॉलरने वाढून ५८६.४१२ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय चलनसाठा ६४५ अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामध्येही रुपयाची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या परकीय चलन साठ्याच्या वापरामुळे ही घट झाली आहे. आरबीआयच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, २१ एप्रिल रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग, परकीय चलन मालमत्तेमध्ये २.१४६ अब्ज डॉलरची घट होवून ती ५१४.४८९ अब्ज डॉलरवर आली. डॉलरमध्ये समाविष्ट परकीय चलन मालमत्तेमध्ये युरो, पाऊंड, येन यांसारख्या नॉन अमेरिकन चलनातील वाढ-घट यांच्या परिणामांचा समावेश असतो.

रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य २.४ कोटी डॉलरने घटून ४६.१५१ अब्ज डॉलर झाले आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्सदेखील $१९ दशलक्षने वाढून $१८.४३१ अब्ज झाले आहेत. आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीकडील देशाचा साठा या आठवड्यात $१४ दशलक्षने घसरून $५.१७६ अब्ज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here