ऊसाचे पैसे लवकरात लवकर भागवण्यासाठी तसेच बँकांमध्ये शेतकर्यांचे होत असलेले शोषण बंद करण्यासाठी भारतीय किसान यूनियन च्या प्रतिनिधी मंडळाने ऊस उपायुक्तांची तसेच अग्रणी बँक व्यवस्थापकांची भेट घेतली. अधिकार्यांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी भरपूर प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले. भाकियू ने इशारा दिला आहे की, कोरोना मुळे सरकारी कार्यालयामध्ये शेतकर्यांचे शोषण वाढले आहे. याला लवकर थांबवले नाही तर आंदोंलन छेडण्यात येइल. बिलारीसह जिल्ह्यातील इतर साखर कारखन्यांवर मोठ्या प्रमाणात ऊस थकबाकी देय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी हरपाल सिंह आणि राष्ट्रीय महासचिव चौधरी महक सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाकियू चे एक प्रतिनिधी मंडळ ऊस उपायुक्त अमर सिंह योंना भेटले. आणि ऊस थकाबाकी भागवण्याची मागणी केली. या नंतर अग्रणी बँक व्यवस्थापक सतीशकुमार गुप्ता यांनाही भेटले. आणि बँकांमद्ये होत असलेले शेतकर्यांचे शोषण बंद करण्याची मागणी केली. अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी समस्यांना सोडवण्याचे आश्वासन दिले. प्रतिनिधीमंडळात हरपाल सिंह, चौधरी महक सिंह, चौदरी समर पाल सिंह, जिल्हाध्यक्ष वेदराज सिंह, चौधरी तेज सिंह, कुलदीप सिंह, नीरजच कुमार उर्फ डब्बू जिला प्रभारी, युवा जिल्हाध्यक्ष यशपाल सिंह आदी सामिल होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.