सहारनपूर: कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजासह ऊस बिले द्यावीत या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
सपाचे ज्येष्ठ नेते, नवाब गुर्जर म्हणाले, कोरोना महामारीमुळे आज प्रत्येक व्यक्ती आर्थिक, मानसिक संकटाशी लढत आहे. यामध्ये शेतकरी सर्वाधिक अडचणीत आहेत. कारण त्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सुमारे ७०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. जर लवकर पैसे मिळाले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
नवाब गुर्जर म्हणाले, कोरोना महामारीमुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सर्व कामकाज ठप्प आहे. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जगण्याची लढाई सुरू असल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहता उसबिले व्याजासह गतीने देण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा ऊस अधिकाऱ्यांची भेट घेईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.