बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली:चीनी मंडी
अतिरिक्त उत्पादनामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगासाठी पुढचा हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. विश्लेषण संस्था ग्रीन पूल यांनी २०१९-२०च्या हंगामाचा पहिला अंदाज व्यक्त केला असून, त्यात जागतिक बाजारात १३ लाख ६० हजार टन साखरेचा तुटवडा असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या हंगामातील अतिरिक्त उत्पादनाविषयीही त्यांनी भाष्य केले आहे. यामध्ये यंदा ३६ लाख टन अतिरिक्त उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यातही ग्रीन पूल यांनी दुरुस्ती केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा (२०१८-१९) २६ लाख ४० हजार लाख टन साखर उत्पादन अधिक होणार आहे. गेल्या हंगामात (२०१७-१८) १९० लाख ६० हजार लाख टन साखर उत्पादन अतिरिक्त झाले होते. त्यामुळेच जगभरात साखरेची बाजारपेठ कोलमडली आहे.
साखरेची बाजारपेठ अतिरिक्त उत्पादनानंतर थेट तुटवड्यापर्यंत पोहोचणे हे अतिशय असामान्य आहे, असे मत ग्रीन पूल यांनी व्यक्त केले आहे. सलग दोन वर्षे अतिरिक्त उत्पादनामुळे गेल्या वर्षभरात साखरेच्या किमती ज्या पद्धतीने घसरल्या त्याचा परिणाम उत्पादन घसरण्यावर होताना दिसत आहे. २०१७-१८च्या हंगामाता साखर उत्पादन इतके अतिरिक्त होते की, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बदल होण्यात झाला आहे.’ थायलंड, पाकिस्तान आणि भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन कमी होणार असल्याने जागतिक बाजारात साखरेचा तुटवडा जाणवेल, असे मत ग्रीन पूलने स्पष्ट केले.
भारतातील साखर उत्पादन यंदा २९५ लाख टनापर्यंत होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. २०१८मध्ये मान्सूननंतरच्या कोरड्या हवामानामुळे उसाची लागवड कमी झाली आहे. भारताची निर्यात रखडली आहे. त्यामुळे सातत्याने साठा वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि साखर कारखाने यांच्यावर दबाव वाढत आहे. सुरुवातीला भारतात ३३५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होताना दिसली आहे, असे निरीक्षण ग्रीन पूलने मांडले आहे.
ब्राझीलच्या दक्षिण मध्य प्रांतात मात्र, साखर उत्पादन यंदाच्या तुलनेत पुढील वर्षी वाढण्याची शक्यता आहे. यंदा २६६ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून, पुढील वर्षी ते २९६ लाख टन होईल, असा अंदाज आहे. याचा अर्थ यंदाच्या हंगामात तेथे साखरेचा उतारा कमी मिळत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील सामान्य हवामानापेक्षा कोरडे हवामान असल्याचा हा परिणाम आहे, असे ग्रीन पूल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २०१९-२०च्या पिकासाठी हा मोठा धोका असणार आहे. कदाचित यंदाच्या हंगामातील अंतिम आकडे आल्यानंतरच पुढचे चित्र स्पष्ट होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp