मैड्रिड: थंडी सुरु झाल्याबरोबर लगेचच कोरोना महामारीचा कहर पुन्हा एकदा सुरु झाला आहे. हे पाहता देशामध्ये सहा महिन्यांसाठी आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कोरोनाने पहिल्या लाटेमध्ये स्पेनमध्ये मोठा कहर माजवला होता. देशामध्ये आतापर्यंत 35 हजारापेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे.
वेबसाईट वर्ल्डोमीटर नुसार, कोरोनाच्या केसमध्ये स्पेन जगात सहाव्या नंबरवर आहे. स्पेनमध्ये कोरोनाचे आतापर्यंत 12 लाख 38 हजार 922 रुग्ण समोर आले आहेत. यापैकी 35 हजार 639 लोकांचा मृत्यु झाला आहे. देशामध्ये आताही दोन हजार 404 लाकांची तब्येत खूपच नाजुक आहे.
स्पेनमध्ये पाच जुलै नंतर अचानक कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होवू लागली होती. तेव्हा देशामध्ये केवळ दोन लाख 76 हजार रुग्ण होते. 6 मे पासून 5 जुलै दरम्यान प्रत्येक दिवशी जवळपास पाचशे रुग्ण समोर आले होते. पण आता वाढत्या रुग्णांनी स्पेन सरकारची चिंता वाढवली आहे. काल देशामध्ये 23 हजार 580 नवे रुग्ण समोर आले. हे एका दिवसामधील आतापयंंत सर्वात अधिक आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी कोरोना च्या नव्या रुग्णांबाबत सांगितले की, यूरोप आणि स्पेन कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहेत. आम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. पीएम सांचेज यांनी सांगितले की, रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लोक घरातून बाहेर पडू शकणार नाहीत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.