पोंडा : संजीवनी साखर कारखान्याच्या भविष्यावर कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे ऊस शेतकर्यांनी सध्याची स्थिती आणि प्रलंबित राहिलेली थकबाकी या बाबात ठोस कारवाई करण्यासाठी पुढच्या आठवड्यात एका तात्काळ बैठक़ीचे आायोजन केले आहे. शेतकरी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत, कारण कारखाना त्यांच्यासाठी ना सुरु आहे ना बंद. राज्य सरकारने कारखान्याच्या भविष्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
गेल्या काही वर्ष्यामद्ये ऊस शेतकरी जगण्यासाठी कारखान्यावर अवलंबून होते. ऊसाचे पीक नकदी आहे, ज्यामुळे अनेक शेतकर्यांनी ऊस शेतीला प्राधान्य दिले. आणि यासाठी संजीवनी कारखाना त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. ऊस शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या नुसार, सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या बैठक़ीत अनेक अश्वासने दिली होती, पण आतापर्यंत हे सारे अपुरे राहिले आहे. राज्य सरकारने कारखाना बंदही केला नाही आणि गाळप हंगामासाठी संचालितही केलेला नाही. ते म्हणाले, गेल्या काही दिवसात कारखाना बंद करण्याबाबत शेतकर्यांना दिल्या जाणार्या रकमेबाबत सरकारला एक योजना सादर केली होती, ज्यामध्ये त्यांना कारखाना बंद होण्याबाबतही आधीच सूचना देण्यास सांगण्याचा मुद्दाही होता. संजीवनी च्या भविष्यावर अजूनपर्यंत काहीच स्पष्टता नाही. ऊसाच्या पुरवठ्याचे पैसेही गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबीतच आहेत. थकबाकीमुळे, शेतकर्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आता शेतकरी ऊसाची शेती करावी की नाही या विवंचनेत आहेत. यासाठी शेतकरी संजीवनी च्या भविष्याबाबत सरकारकडून स्पष्टतेच्या प्रतिक्षेत आहेत. अलीकडेच, शेतकर्यांच्या एक बैठक़ी दरम्यान कारखाना प्रशासकाने त्यांना कारखाना बंद होण्याबाबत सूचना दिली आणि सांगितले की, एक नवा कारखाना सुरु करणे संभव नाही. त्यानंतर राज्य सरकारने स्पष्ट केले की, संजीवनी साखर कारखाना बंद करण्याची कोणतीही योजना नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.