नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनाचे नवे रुप वाढत आहे. देशामद्ये यूके मध्ये कोरोना स्ट्रेन मुळे संक्रमितांची संख्या वाढून 20 झाली आहे. मंगळवारपर्यंत ही संख्या केवळ 6 होती. आतापर्यंत एकूण 107 सैंपल चा रिपोर्ट आला आहे. ज्यामध्ये 20 यूके स्ट्रेन मुळे संक्रमित आढळले आहेत. 20 पैकी सर्वात अधिक 8 पॉजिटिव्ह रुग्ण एनसीडीसी दिल्लीच्या लॅब मध्ये आढळून आले आहेत.
29 डिसंंबर ला देशातील वेगवेगळ्या लॅब रिपोर्टनुसार, एनसीडीसी दिल्लीमध्ये 14 रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 8 रुग्णांमध्ये कोंरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. तर, एनआयबीजी कल्याणी मध्ये 7 पैकी एकामध्ये नवा स्ट्रेन आढळून आला. एनआयव्ही पुण्यामध्ये 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी एक रुग्णामध्ये आढळून आला. एनआयएमएचएएनएस मध्ये 15 रुग्णांच्या तपासणीमध्ये 7 मध्ये नवा स्ट्रेन मिळाला.
सीसीएमबी मध्ये 15 रुग्णांच्या तपासणीमध्ये दोघांमध्ये नवा स्ट्रेन आढळला. आयजीबीआय मध्ये 6 मधून एक रुग्ण आढळला, दिल्लीमध्ये समोर आलेल्या रुग्णांवर दिल्ली सरकारच्या एका अधिकार्याने सांगितले की, सर्व लोकांना एलएनजेपी हॉस्पीटल च्या विशे केंद्रामद्ये दाखल करण्यात आले आहे आणि ते आता स्थिर आहेत.
गेल्या दिवसांमध्ये कोरेोनाच्या नव्या रुपावर केंद्र सरकारने सांगितले की, कोरोना वैक्सीन कोरोनाच्या नव्या रुपाविरोधातही काम करेल आणि असा कोणताही पुरावा मिळालेला नाही की ही लस ब्रिटेन किंवा दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या सार्स सीओव्ही 2 साठी नाकाम राहिली. प्रधान वैज्ञानिक सल्लगार के विजय राघवन यांनी सांगितले की, आतापर्यंत हे आढळून आलेले नाही की, ही लस ब्रिटेन आणि दक्षिण अफ्रीकेमध्ये समोर आलेल्या कोविड 19 च्या नव्या स्ट्रेन साठी नाकाम राहिली आहे.