शंकर कारखान्यातर्फे ऊसतोड मजुरांना एकरकमी ३४ टक्के वाढीव फरक : व्हाईस चेअरमन अॅड. मिलींद कुलकर्णी

सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस तोडणी मजुरांना तोडणी दरामध्ये ३४ टक्के वाढ लागू करुन त्याच्या फरकाची संपूर्ण रक्कम १३ मे रोजी बँकेत जमा केली आहे. राज्य साखर संघ स्तरावर झालेल्या बैठकीत ऊस तोडणी, बैलगाडीने वाहतूक करण्याच्या सुधारीत सामंजस्य करारानुसार ही प्रक्रिया केली आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड. मिलींद कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

याबाबत अॅड. कुलकर्णी यांनी सांगितले की, याचबरोबर हंगाम २०२३-२४ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला दर पंरधवड्याची ऊस बिलाची रक्कम प्रती टन २,६०० रुपयांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. कारखान्याची गत हंगामामधील एफआरपी प्रती टन २,१९२ रुपये आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा ४०८ रुपये प्रती टन देण्यात आले आहेत. ऊस तोडणी मजूर, वाहतूकदारांना एकरकमी फरक देणारा हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. नव्या गळीत हंगाम २०२४-२५ साठी तोडणी व वाहतुक कंत्राटदारांचे करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here