प्रगतशील शेतकऱ्याने पिकवला १५ फूट लांब ऊस

शाहजहांपूर : शेती क्षेत्रात दररोज नवनवे प्रयोग करणाऱ्या कांट विभागातील कुर्रिया ढोंढो (गंगानगर) गावातील प्रगतशील शेतकरी कौशल मिश्रा यांनी आपल्या दोन एकर शेतात जवळपास १५ फूट लांब ऊस पिकवला आहे. उसाची उंची एवढी जास्त झाली आहे की जोरदार वाऱ्यामुळे तो पडू नये यासाठी ऊस बांधताना शिडीचा वापर करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी भावलखेडा विभागातील नागरपाल गावातील विपिन कुमार यांनीही जवळपास १५ फूट लांबीचा ऊस पिकवला होता. मात्र तो कोसी ०२३८ प्रजातीचा होता.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांनी सांगितले की, लाल सड रोगामुळे कोसी ०२३८ प्रजातीच्या पिकावर बंदी घातली आहे. कौशल मिश्रा यांनी कोसी १३२३५ या प्रजातीच्या उसाचा वापर करून हे उत्पादन घेतले आहे. हा ऊस लवकर पक्व होण्यासह जादा उत्पादन आणि अधिक उतारा देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कोसी १३२३५ ची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. कौशल यांनी पिकवलेला ऊस तोडणीस आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत त्याची लांबी १८ ते २० फुटांपर्यंत पोहोचू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here