नवी दिल्ली: कोरोना वायसर च्या दैनिक रुग्णांमध्ये आज किरकोळ वाढ पाहण्यास मिळाली आहे. रविवारी 45,674 दैनिक रुग्ण समोर आले. तर गेल्या 24 तासात 45,903 नव्या कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे होणार्या मृत्युच्या संख्येतही आज घट दिसून आली. गेल्या 24 तासामध्ये कोविड 19 मुळे 490 लोकांचा मृत्यु झाला आहे. कोरोनामुक्त होणार्या रुग्णांची संख्या 79 लाखावर गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोविड 19 च्या 45,903 नवे रुग्ण नोंदवले गेले आहे. दरम्यान कोरोनामुळे 490 लोंकांचा मृत्यु झाला आहे. देशामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 85,53,657 इतकी आहे.
मंत्रालयाच्या आकड्यांनुसार देशामध्ये सक्रिय रुग्णांमध्येही मोठी घट आहे. सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 5,09,673 आहे. आकड्यांनुसार देशामध्ये कोरोनामुक्त असणार्यांची संख्या 79,17,373 आहे. गेल्या 24 तासात 48,405 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशामध्ये कोरोनामुळे मरणार्यांची संख्या 1,26,611 इतकी आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.