जालना : एसपी शुगर अँड ऍग्रो प्रा लिमिटेड या कारखान्याच्या ६ व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी करण्यात आली. या जागरी पावडर निर्मिती कारखान्याने यंदाच्या हंगामात दोन लाख सहा हजार सहाशे दहा मेट्रिक टन ऊस गाळप केला. सरासरी १४.५७ टक्के उताऱ्यासह तीन लाख एक हजार एकशे एकतीस क्विंटल जागरी पावडर उत्पादन झाले. कारखान्याचा गळीत हंगाम ६ ऑकटोबर २०२३ पासून सुरू झाला होता. त्याची सांगता गुरुवारी करण्यात आली. कारखान्याने यंदाच्या हंगामात प्रती टन २,८०० रुपये दर दिला.
गळीत हंगाम सांगता प्रसंगी सकाळी कारखान्यात ऊस वाहनांचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या हस्ते वाहतूक ऊस तोड ठेकेदारांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. चेअरमन सुरेश पाटील यांच्या हस्ते वाहतूक ऊस तोडणी ठेकेदारांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. राजाभाऊ लोंढे, मुख्य शेतकी अधिकारी गंगाधर गुंड, चिफ केमिस्ट चंद्रसेन मारवडकर , प्रताप चौरे, इलेक्ट्रिक इंजिनीअर मंगेश पोतदार, विजय लोंढे, बाळासाहेब धुमाळ, अशोक जाधव ,सोमेश होगले, दीपक मुळूक, आलम सय्यद, स्वप्नील पाटील, संतोष माळी, पंकज आवारे आदी उपस्थित होते.