बीडमधील ऊसतोड कामगार बनला व्यावसायिक, बनला लखपती!

बीड : अत्यंत गरिबीतून वर आलेले बीड जिल्ह्यातील घाटसावळी या गावातील हरिदास अंधारे हे ऊसतोड कामगार म्हणून काम करायचे. ऊसतोड कामगार म्हणून काम करत असताना अंधारे यांनी मुकादमाकडून उचल म्हणून काही पैसे घेतले होते. हे पैसे त्यांनी सायकल दुकानासाठी गुंतवले. मात्र, काही कारणास्तव ते दुकान काही वर्षांनी बंद पडलं आणि पुन्हा त्यांच्या डोक्यावर कर्ज झाले. त्यामुळे त्यांनी ऊस तोडणीचे काम चालू ठेवले. आता त्यांनी पेव्हर ब्लॉक निर्मितीचा व्यवसाय करुन या व्यवसायात यश मिळवले आहे. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

न्यूज१८ लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सध्या पेव्हर ब्लॉकचा व्यवसाय करणाऱ्या हरिदास अंधारे यांची कहाणी संघर्षाने भरलेली आहे. ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत असतानाच त्यांनी काही वर्षांनी आपल्या मुलाच्या कल्पनेतून आणि कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने पेव्हर ब्लॉकचा व्यवसाय सुरू केला आणि खऱ्या अर्थाने येथूनच त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्याचा खरा प्रवास चालू झाला. सुरुवातीला त्यांना आर्थिक अडचणी आल्या. मात्र, हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. व्यवसायामध्ये भरभराट होऊ लागली. आता दहा गुंठे क्षेत्रामध्ये त्यांचा पेव्हर ब्लॉकचा प्लांट आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here