नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा हाहाकार माजला आहे. भारतात प्रत्येक दुसर्या दिवशी एक लाख कोरोनाग्रस्त होत आहेत. 14 ऑगस्ट 2020 च्या सकाळपर्यंत देशामद्ये कोविड 19 चे एकूण 24.61 लाख लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 64,553 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत, तर 1,007 जणांचा मृत्यु झाला आहे. देशामध्ये आतापर्यंत एकूण 24,61,190 कोरोना केस नोंद झाल्या आहेत. कोरोनामुक्तांची संख्याही 17 लाखाच्या वर आहे. आतापर्यंत 17,51,555 लोकांनी कोरोंनावर विजय मिळवला आहे. गेल्या 24 तासामध्ये 55,573 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकवरी रेट 70.17 टक्के सुरु आहे. देशामध्ये एकूण कोरोना ग्रस्तांपैकी 26.88 टक्के केस अॅक्टीव्ह आहेत.
तर देशामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 48,049 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशामध्ये कोरोनाचा मृत्यु दर आता 1.95 टक्के आहे. केंद्र सरकारचे लक्ष्य या रेटला 1 टक्क्यांपेक्षाही खाली आणण्याचे आहे. देशामध्ये आता कोरोनाचा पॉजिटिवीटी रेट 7.60 टक्क्यावर आहे. अर्थात जितक्या कोरोना टेस्ट होत आहेत, त्यापैकी 7.60 टक्के रुग्ण कोरोना संग्रमित आहेत. 13 ऑगस्टला आतापर्यंतच्या सर्वात अधिक टेस्ट झाल्या आहेत. 13 ऑगस्टला एक दिवसात 8,48,728 टेस्ट झाल्या आहेत. कोरोना सुरु झाल्यापासून 13 ऑगस्ट च्या तारखेपर्यंत 2,76,94,416 सॅम्पलची टेस्टिंग करण्यात आले आहे.
गेल्या 10 दिवसांमध्ये भारत प्रत्येक दिवशी जगामध्ये कोणत्याही देशापेक्षा अधिक कोरोनाची नवी प्रकरणे नोंदवून घेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडयांनुसार, भारतात 4 ऑगस्ट पासून13 ऑगस्ट पर्यंत जगातमध्ये प्रत्येक दिवशी सर्वात अधिक केस नोंद करण्यात भारत सर्वात पुढे राहिला आहे. देशाने 197 दिवसांमध्ये 24 लाखाचा आकडा पार केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.