दाहा, बागपत (उत्तर प्रदेश): पुसार बस स्टॅन्ड वर बुधवारी ऊस केंद्रातून उसाबाबत भैसाना कारखान्यात जात असणारा ट्रक अनियंत्रित होवून पलटला. यामुळे बडौत बुढाना मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सूचनेवर पोचलेल्या पोलिसांनी कारखाना अधिकार्यांना सूचना देवून लोडरने ऊस उचलला. पोंलिसांनी ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या वाहनांशी संपर्क मार्गांतून बाहेर काढले. दरम्यान रस्ता पाच तासापर्यंत रोखण्यात आला.
ट्रक चालक अद्बुल यांनी सांगितला की, पुसार बस स्टॅन्ड च्या जवळ समोरुन गतीने येणार्या कारला वाचवण्याच्या चक्करमध्ये ट्रकचे संतुलन बिघडले आणि ट्रक रस्त्यावर पलटला. ट्रक पलटल्यामुळे ट्रफीक जॅम झाला. बडौत बुढाना मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मार्गावर जवळपास पाच तासांपर्यंत ट्रॅफिक जाम होता. सूचनेवर पोचलेल्या पोलिसांनी वाहनांना संपर्क मार्गांवरुन रवाना केले. पोलिसांच्या सूचनेवर कारखाना अधिकार्यांनी लोडर पाठवून मार्गावरुन ऊस हटवला. तेव्हा कुठे मार्गावर वाहनांची वाहतुक सुरु झाली. पुसार बस स्टॅन्ड वर एका आठवड्यामध्ये तीन वेळा ऊसाचा ट्रक पलटला आहे.