शामली : सोमवारी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी एका बैठक़ीचे आयोजन करण्यात आले होते . ज्यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशामध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत, पण प्रदेश सरकार गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. पहिल्यांदा शेतकर्यांना लॉकडाउन मुळे आपल्या पीकांना चांगले पैसे मिळाले नाहीत आणि आता साखर कारखाने शेतकर्यांची ऊस थकबाकी देखील भागवत नाही. जिल्ह्यातून ऊस मंत्री असूनही शामली साखर कारखान्यांकडून जवळपास 600 करोड रुपये थकबाकी भागवणे बाकी आहे, हे पैसे मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकार आणि साखर कारखानदारांंच्या गोंधळात शेतकरी आता उपासमारीच्या उंबरठ्यावर पोचला आहे. त्यांनी सांगितले की, जर शेतकर्यांचे पैसे लवकर भागवले नाहीत तर ते आंदोलन करतील. यावेळी बाबू खान, वैभव गर्ग, अशोक जैन, योगेश भारद्वाज, रविंद्र आय, ठाकूर लाखन सिंह, अंकुर जैन, पुनीत शर्मा, आरिफ आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.