सिंधुदुर्ग : कोकणात ऊस शेती म्हटल कि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण कोकणात आंबा, काजू, नारळ उत्पादनाबरोबरच उसाचे मळे पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऊस शेतीमुळे शेतकऱ्यांना नवा आर्थिक स्रोत सापडला आहे. कोल्हापूरच्या तरुणाने कोकणात ऊस शेतीत मिळवलेले यासह नक्कीच कौतुकास्पद आहे. मूळ कोल्हापूरचे असलेले संग्राम धंजे यांनी 15 वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात व्यवसाय सुरु केला. कोल्हापुरात ऊस शेती होते, तर मग कोकणात का नाही, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. मग त्यांनी त्यांनी 10 एकर जागा करार पद्धतीत घेतली आणि त्यापैकी 8 एकर जागेवर ऊस लागवड केली. विशेष म्हणजे, मेहनतीच्या जोरावर संग्राम यांनी उसाचे उच्च गुणवत्तेचे उत्पादन सिंधुदुर्गच्या मातीत घेतले.
संग्राम धंजे यांना ऊस शेतीतून प्रति एकर खर्च वगळता एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन पियाळी गावातील इतर शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.यामुळे शेतकऱ्यांसाठी नफा कमावण्याचा हा नवा मार्ग खुला झाला आहे.संग्राम धंजे यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांनाही ऊस शेतीची प्रेरणा मिळाली. आता संग्राम यांच्या प्रमाणे अन्य काही शेतकरीही ऊस शेती करत आहेत.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.