ऊस दरवाढीसाठी आम आदमी पक्षाचे आंदोलन

हरिद्वार : आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचे दर वाढवण्याच्या मागणीसाठी धनपुरा चौकात सरकार विरोधात निदर्शने केली. ऊसाच्या किमान समर्थन मूल्यामध्ये वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. लवकरात लवकर दरवाढ लागू करावी अशी मागणी करण्यात आली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश शर्मा यांनी कार्यकर्त्यांसह भाजप सरकारविरोधात आंदोलन करीत ऊस दरवाढीची मागणी केली. ते म्हणाले, २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ मध्ये दुप्पट केले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. राज्यात आज विजेचे दर सर्वाधिक आहेत. बियाणे, खते, किटकनाशके, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांची कर्जे त्यामुळे थकीत झाली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा आपने दिला. ग्रामीण विभाग अध्यक्ष संजू नारंग, हरिद्वार अनिल सती, पवन धीमान, अंकुर बागडी, खलील राणा, खालिद हसन हरिशचंद्र, उस्मान मलिक, तबरेज आलम, मनोज कश्यप, फिरोश जमशेद, रवी चौहान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here