थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी आपचे आंदोलन

मेरठ : ऊसाची थकबाकी देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या बॅनरखाली विविध नेत्यांनी, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी दीपक मिना यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यामध्ये २०२१-२२ च्या गळीत हंगामातील ऊस बिलांची थकबाकी व्याजासह मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार आगामी २०२२-२३ या गळीत हंगामासाठी ऊसाचा दर ५०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्वरित जाहीर करावा अशी मागणी नेत्यांनी केली. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश चौधरी, अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष गुरमिंदर सिंग, जिल्हा कोषाध्यक्ष एस. के. शर्मा, जी. एस. राजवंशी, मदनसिंग मान, राहुल चौधरी, अनमोल कोरी, सलीम मसूरी, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here