कोल्हापूर विभागात अद्याप सुमारे ७० टन ऊस शिल्लक

कोल्हापूर : कोल्हापूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत ४ ते ५ लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. यंदा कोल्हापूर विभागातील कारखाने १५ नोव्हेंबरपासून सुरू झाले. गेल्या ७३ दिवसांत जिल्ह्यात एक कोटी ३९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून एक कोटी ७८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सध्या हंगाम तिसऱ्या टप्प्यात आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे ७० टन ऊस शिल्लक असल्याचा साखर सहसंचालक कार्यालयाचा अंदाज आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने साखर कारखानदारीला थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या देशात ५०९ साखर कारखाने सुरू झाले आहेत. यापैकी सर्वाधिक १९७ साखर कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले. कोल्हापूर विभागात सहकारी आणि खासगी मिळून ३७ साखर कारखाने सुरू झाले. विभागातील कारखान्यांना ११.९४ टक्के साखर उतारा आहे. आतापर्यंत गाळप झालेल्या साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांमध्ये कुंभी कारखाना १३.४६ टक्के प्रथम क्रमांक तर दुसऱ्या क्रमांकावर बिद्री कारखाना असून त्यांचा साखर उतारा १३.०३ टक्के आहे. तर खासगीमध्ये दत्त दालमिया – आसुर्ले कारखान्याचा साखर उतारा १३.९७ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here