कोल्हापूर, दि. 17 जून 2018: साखरेचे दर ढासळल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठरलेल्या एफआरपीची रक्कम देण्यास हप्ते पाडावे लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडून पहिला हप्ता 2800 ते 3000 रुपयांपर्यंत दिला जाणार होता. मात्र, साखर दर कपातीमुळे प्रतिटन उसाचा हप्ता 500 रुपयाने कमी करण्यात आला होता. सध्या साखरेच्या दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने 30 जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्या दरम्यान अदा करणार आहेत. याबाबत कोल्हापूरातील सर्वच कारखान्यांनी थकीत एफआरपैकी 350 ते 400 रुपये अदा करण्याची तयारी दर्शविली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध संघटना आणि पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या उसाच्या उर्वरित एफआरपीसाठी आंदोलन केली जात आहेत. साखर सह संचालकांकडेही निवेदन देवून संबंधीत कारखान्यांवर मोर्चा काढला जात आहे. साखरेचे दर वाढले आहेत आता एफआरची रक्कम तत्काळ द्या, असा ससेमिरा कारखान्यांच्या मागे लावला असल्याने कारखान्यांनीही उर्वरित एफआरपीमधील काही रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे.
दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेमध्ये (केडीसीसी) कारखानदारांनी बैठक़ घेवून एफआरपीचे दोन हप्ते केले होते. गाळप हंगाम सुरु होत असताना ठरवून दिलेली एफआरपी मध्ये तोडमोड करून काही रक्कम शिल्लक ठेवली होती. ज्या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता 3000 रुपये जाहीर केला होता त्यांनी 2500 रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. तसेच दोन महिन्यात उर्वरित 500 रुपये देणार होते. मात्र दोन ते अडीच महिने झाले तरीही उर्वरित एफआरपी देण्याचे नाव साखर कारखान्यांकडून घेतले जात नव्हते. तसेच, साखरेला दर नाहीत, याचेही भान शेतकऱ्यांना होते. त्यामुळे आता जर साखरेचे दर वाढत असतील तर तत्काळ एफआरपी दिली पाहिजे. अशी मागणी शेतकरी, संघटना व पक्षांकडून घेतली जात होती.
कुंभी कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीमध्ये 500 रुपये प्रतिटन शिल्लक राखले होते. दरम्यान, 30 जूनच्या आत उर्वरित 500 रुपयांपैकी 400 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. दरम्यान, इतर साखर कारखानेही आप-आपली एफआरपीची रक्कम देण्यास तयार आहेत.
आमदार चंद्रदिप नरके
अध्यक्ष, कुंभी-कासारी साखर कारखाना