ऊसाच्या नव्या वाणांमधून मिळणार भरपूर उत्पन्न, शेतकऱ्यांचा नफा लाखात

गया : जिल्ह्यातील इमामगंज विभागामधील सोहेल गावात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून ऊस शेती करत नवी क्रांती सुरू केली आहे. जवळपास ८० एकरमध्ये ऊस पिक घेण्यात आले असून यातून या भागातील कृषी परंपरेला नवा आकार दिला आहे. सोहेल ग्रुपचे चेअरमन विजय कुमार यांनी COJ १८५ या जातीचे वाण निवडले असून या उसापासून उच्च दर्जाचा गूळ तयार करण्यास मदत मिळते.

हिंदी न्यूज१८ मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, पू्र्वी या भागात हिरवा वाटाणा आणि कुळीत ही पिके घेतली जात होती. मात्र, येसोहेल गावातील २५ हून अधिक शेतकऱ्यांनी मिळून आपली पारंपरिक पिके सोडून ऊसाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे शेतकरी ८० एकरात ऊस लावून चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच गट स्थापन केले असून एकमेकांच्या अनुभवाचा फायदा घेत ते जमिनीची सुपीकता वाढण्यास आणि उत्पादन वाढण्यास पुरक ठरत आहे.गेल्यावर्षी ५० एकर क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आली होती. यंदा यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करून सुमारे 80 लाख रुपयांचा नफा मिळण्याची शक्यता आहे. ऊस विकास विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला चालना देण्यासाठी पावले उचलली आहेत. नफ्यात आणखी वाढ व्हावी यासाठी मोठे गाळप युनिट उभारण्याची त्यांची मागणी आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here