हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नानौता (सहारणपूर, उत्तर प्रदेश) : नानौता येथील किसान सहकारी साखर कारखान्यात आणखी एक अपघात झाला असून, त्यात दोघेजण गंभीर जखम झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील हा सहावा अपघात असून, दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नानौता येथील सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी रात्री उशिरा चंद्रपाल आणि लोरिक यादव दोघे वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी झालेल्या अपघातात दोघेही जखमी झाले. सुरुवातील त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारखान्याचे सरव्यवस्थापक डॉ. प्रशांत कुमार यांनी सांगितले की, रात्री कारखान्यात पाईल खोलताना हा अपघात झाला आहे. यापूर्वी कारखान्यात २१ डिसेंबरला एकाचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. ५ मार्चला उंचावरून पडून एकजण मृत्यूमुखी पडला. तर २२ मार्चला ऊस ठेकेदाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला होता. १ एप्रिलला ऊस यार्डात आग लागली होती तर, ७ एप्रिलला झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला होता.