साखर कारखान्यात अपघात; शेतकरी गंभीर

बागपत : रमाला सहकारी साखर कारखान्यात ट्रॅक्टरमधून चेनद्वारे ऊस काढून घेताना हुक निसटल्याने खाली कोसळलेल्या ऊसाच्या मोळीखाली सापडून शेतकरी गंभीर जखमी झाला. साखर कारखान्यातील कामगार आणि शेतकऱ्यांनी चेन बंद करून तातडीने या शेतकऱ्याला बडौत येथील दवाखान्यात दाखल केले.

कासिमपूर येथील रहिवासी दिनेश वेदपाल हे सकाळी ट्रॅक्टरमधून ऊस घेऊन रमाला साखर कारखान्यात आले होते. वजनकाट्यावर ऊस वजन करून तो क्रेनद्वारे उचलून नेला जात असताना चेनमध्ये अडकून दोरी निसटली आणि ऊस खाली कोसळला‌. यामध्ये शेतकरी दिनेश उसाखाली सापडले. तेथे उपस्थित कामगारांनी क्रेन बंद करून तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीने दिनेश आणि ट्रॅक्टर बाजूला केला. दिनेशला बेडौल येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मुख्य व्यवस्थापक आर. बी. राम यांनी सांगितले की, शेतकरी ऊसाची दोरी सोडायला विसरल्याने हा अपघात झाला. जखमी दिनेशला क्रेनच्या चेनमधून बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here