साखर कारखान्यात अपघात

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पिलीभीत (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

पूरनपूर सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. ऊस उतरण्याच्या क्रेनेच स्ट्रक्चर तुटल्यामुळे खाली कोसळले. त्यात क्रेन ऑपरेट करणारा कर्मचारीही कोसळून गंभीर जखमी झाला. अपघातामुळे कारखाना परिसरात गोंधळ उडाला आणि उसाचे गाळपही काही काळ रोखण्यात आले.

पूरनपूर सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणींमधून जात आहे. कारखान्यात मेंटेनन्सची कामे नीट झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यात निष्काळजीपणा केल्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात जात आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही कारखान्यात अपघात झाला होता. त्यात अल्फाइटर टँक कोसळला होता. त्यामुळे  शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप काही दिवस ठप्प झाले होते. त्यामुळे ऊस इतर कारखान्यांमध्ये गेला.

नुकत्याच झालेल्या अपघातात ऑपरेटरसह क्रेन ट्रॉलीवर कोसळली. यात गोरखपूरचा कर्मचारी,ऑपरेटर दुर्योधन (वय ५६) गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याला कर्मचाऱ्यांनीच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने घटनास्थळी इतर कर्मचारी नव्हते. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. या संदर्भात कारखान्याकडून कोणतिही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र मिश्र यांनी दिली. त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश तातडीने देण्यात आले आहेत.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here